!DOCTYPE html>
अन्न हा कोणताही पदार्थ आहे, जो जीवांना पौष्टिक समर्थन प्रदान करण्यासाठी वापरला जातो.सजीवांच्या पोषणासाठी, त्यांची वाढ होण्यसाठी, त्यांच्या दैनंदिन कामासाठी लागणारी उर्जा मिळवण्यासाठी सजीवांकडून ग्रहण केल्या जाणाऱ्या पदार्थाला अन्न असे म्हणतात. तसे जीवशास्त्राच्या व अन्य शास्त्रानुसार अन्नाच्या अनेक व्याख्या आहेत.अन्न विविध घटकांना एकत्र करून तयार केले जाते.
अन्नात असलेले विविध घटक म्हणजे प्रथिने, स्बिग्ध पदार्थ, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि चरबी . हे सर्व सजीवांच्या पेशींद्वारे वापरले जातात. शरीराचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी शरीराला संतुलित प्रमाणात आहाराची गरज असते. वरील पाच पोषक तत्वाकडून शरीराला संतुलित आहार मिळू शकतो. संतुलित आहारात ताज्या पालेभाज्या, फळांचा आणि कडधान्याचा समावेश होतो.
मानवी शरीरातील स्नायू, हाडे, रक्त आणि त्वचा आणि तयार करण्यासाठी, देखरेख करण्यासाठी आणि पुनर्संचयित करण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. आपल्या जीवनातील अन्नाचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. कारण ती जगण्याची मूलभूत गरज आहे.
निरोगी शरीरासाठी योग्य प्रमाणात संतुलित आहाराची गरज असते. यामध्य प्रथिने, कार्बोहायड्रेट, चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश होतो. आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी आवश्यक प्रमाणात लागणारे सर्व पोषक तत्व संतुलित आहारातून मिळतात. ताज्या आणि पालेभाज्या त्यासाठी उपयुक्त असतात. फळांमधून जीवनसत्व आणि खनिजे मिळतात. उदा. केळी, सफरचंद, नारळ, संत्री, द्राक्षे, किवी इ. शरीराच्या योग्य कार्यासाठी पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्न खाणे आवश्यक आहे.आपल्या दिर्घ आयुष्यासाठी सकस व पौष्टीक आहाराची गरज असते, सकस पदार्थांचे सेवन करून खाण्याच्या चांगल्या सवयी लावाव्यात. जीवनसत्वांचे योग्य प्रमाणात सेवन आपले हाडे, दात आणि त्वचा निरोगी ठेवतात,
तसेच रोगांशी लढण्यासाठी मदत करतात. भाजीपाला आणि तृणधान्ये: यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. दूध, लोणी, चीज इ पदार्थांना दुग्धजन्य पदार्थ असेही संबोधले जाते. दुग्धजन्य पदार्थ ही गायी, शेळ्या, म्हैस इत्यादी पाळीव प्राण्यांपासून मिळवलेली उत्पादने आहेत. दुग्धजन्य पदार्थ अत्यंत पौष्टिक आणि कॅल्शियमने समृद्ध असतात. भाज्या तसेच हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी लाभदायक असतात जसे कि पालक, मेथी इ. मासे आणि मांसयुक्त पदार्थ हे प्रथिनांचे मुख्य स्त्रोत आहेत. मासे आणि मांस खाल्ल्याने शरीराला प्रथिनांच्या स्वरूपात पोषण मिळते. ते वाढ आणि देखभालीसाठी उपयुक्त ठरतात. तृणधान्ये आणि शेंगा कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्रोत आहेत जसे की बाजरी, कॉर्न, नाचणी इ.
शाळेत मुलांना डबा आवश्यकतेनुसारच द्या. मुलांना अन्नाचे महत्व पटवून सांगा.
लग्न समारंभांच्या ठिकाणी अन्न वाचवण्याची प्रतिज्ञा घ्या व लागेल तेवढेच ताटात अन्न घ्या. अन्न वाया जाणार नाही त्याकडे लक्ष द्या.
कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी उपहारगृहात अन्न वाया जाणार नाही याची दक्षता घ्या.
रस्त्यावर अनेक मुले अशी आहेत जी रोजचे जेवण मिळवण्यासाठी कष्ट करत आहेत. त्यामुळे लोकांनी अन्न वाया घालवू नये.