!DOCTYPE html>
सर्वेनुसार काही निरीक्षणे नोंदवली गेली आहेत.
सगळ्यात जास्त तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन करणारा देश म्हणून भारताची ओळख
परंतु १९५ दशलक्ष इतकी लोकसंख्या दररोज रात्री उपाशीपोटी झोपते.
रोज ३००० मुलांचा मृत्यू कुपोषण व पौष्टिक अन्न न मिळाल्याने होत आहे.
भारतात सर्वाधिक कुपोषित आणि भुकेली लोकसंख्या आहे.
भारतात सुमारे 2 दशलक्ष टन गहू वाया जातो.
देशात दरवर्षी ५० हजार कोटी रुपयांचे अन्नधान्य वाया जाते.
शहरी भारतात आपण जे काही खरेदी करतो त्यापैकी 20% फेकले जाते.
अन्नाची नासाडी रोखण्यासाठी आणि भूकेलेल्यापर्यंत अन्न पोहचविण्यासाठी प्रयत्न करूया.
आपण जर एक संवेदनशील मनुष्य म्हणून ह्या सर्व बाबी समजून घेतल्या तर आपण कधीही अन्न वाया घालवणार नाही तसेच दुसर्या कुणालाही अन्नाचा अपव्यय करू देणार नाहीत.
हे चित्र बघितल्यावर एवढेच म्हणावेसे वाटते हि खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. का कुणास ठाऊक मनुष्य प्रगती करतांना त्यातला माणुसकी मागे सोडत चालला आहे, माणूसपण हरवत चालला आहे, कुठेतरी काहीतरी विसरत चालला आहे. एके काळी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती राबवावी लागली. आपण भारतात हरितक्रांती यशस्वी राबवलीही पण.... आज आपण जगाला अन्नधान्य पुरवतो, निर्यात करतो. मात्र आजही खूप मोठी लोकसंख्या उपाशी झोपते. किती मोठा विरोधाभास आहे ना हा. यासाठी खूप कारणापैकी योग्य नियोजनाचा अभाव हे एक कारण आहे. ताटात जेवण घेताना आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्या शब्दांत, आपण आपल्या पोटाला आवश्यक तेवढेच घेतले पाहिजे. नाही तर अन्नाची नासाडी होईल. भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना एक वेळचे जेवणही मिळत नाही. ते अनेक दिवस उपाशी राहतात आणि नेहमी आजारी असतात. . शिवाय, आपण नेहमी गरजूंना शक्य तितके अन्न पुरवले पाहिजे.
एक संवेदनशील आणि जवाबदार व्यक्ती म्हणून खाण्याचे पदार्थ तोंडाला लावणे हे कितपत योग्य आहे?
लग्नसमारंभात वाया जाणारे अन्न आपण असेच उघड्या डोळ्यांनी बघणार आहोत का?
तोंडाला केक लावून अन्न वाया घालवनार्याच्या पद्धतीचे आपण समर्थन करणार का?
आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली अन्नाची होणारी नासाडी आपल्याला आवडेल का?
सामुदायिक जेवणाच्या कार्यक्रमात मनोरंजनाच्या नावाखाली अन्न वाया जातांना आपण बघू शकता का?
अन्नाच्या कमतरतेमुळे रात्री कुणीतरी उपाशी झोपलेले तुम्हाला चालेल का?
विनाकारण वाया घालवलेल्या अन्नामुळे होणारे पैश्याचे नुकसान आपल्याला परवडेल का?
पौष्टिक अन्नाच्या कमतरतेमुळे झालेले आजार तुम्ही आनंदाने सहन कराल का?
एक चांगला बदल घडविण्यासाठी आपण तयार आहात का?
भूक लागल्यावर खाणे हि प्रवृत्ती
भूक न लागताच खाणे हि विकृती
भुकेलेल्यांना खाऊ घालणे हि संस्कृती
- विनोबा भावे
आजकाल वाढदिवसाबरोबरच ऑफिसच्या उद्घाटनात, लग्न व निरोप समारंभांमध्ये केक कापण्याची प्रथा बघण्यास मिळते. काही ठिकाणी खाण्याचा केक तोंडाला लावायची पद्धत पाहायला मिळते. कृपया असल्या गोष्टी टाळाव्यात व त्या करू नयेत व अन्न वाया घालवू नये. तरीही काही लोक असा विचार करत नाहीत की अजूनही काही लोक आहेत ज्यांना ते काहीच मिळत नाही.