!DOCTYPE html>
अन्नधान्याची निर्मिती जेव्हा आपला बळीराजा करीत असतो, तेव्हा बऱ्याच संकटाना त्याला सामोरे जावे लागते. पिक उभं करण्यासाठी प्रचंड मेहनत तो घेत असतो. जमिनीची मशागत करत, जमीन सुपीक करीत असतो. चांगल्या प्रतीच्या बियाणाची निवड करतो, पिकाला वेळेवर योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दिवस रात्र कष्ट उपसतो. पिक जोमाने वाढावे त्यासाठी खत उपलब्ध करण्यासाठी झटत असतो. पिकांना रोगराई पासून वाचवतो, एवढे सर्व करून अस्मानी संकटापासून पिकाचे रक्षण करावे लागते. असा सर्व खडतर प्रवास पार केल्यानंतर व कापणी, मळणी सारख्या पिक काढण्याच्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अन्नपूर्णेच्या कृपेने आपल्या सर्वांच्या ताटात अन्न येते. ते आपण वाया घालवायचे का? अन्न वाया जाऊ दिले पाहिजे का?
अन्न वाचवण्याची प्रतिज्ञा
"मी सुजाण व जबाबदार नागरिक ह्या नात्याने प्रतिज्ञा घेतो/घेते कि, मी अन्न किंवा त्याचा कुठलाही घटक वाया जाऊ देणार नाही. तसेच अन्नाचा योग्य वापर करेन. एक जबादार नागरिक म्हणून ते माझे कर्तव्य आहे व ते मी रोज निभावेल. अन्न हेच पूर्णब्रह्म."
+F Fortified Food, featuring Sakshi Tanwar
Shreemati Vlogger - Aaj Se Thoda Kam | FSSAI
Aaj Se Thoda Kam - The Eat Right Movement, featuring Rajkummar Rao
Save Food Pledge At Siddhi International Academy.
अन्न हा कोणताही पदार्थ आहे, जो जीवांना पौष्टिक समर्थन प्रदान करण्यासाठी वापरला जातो.सजीवांच्या पोषणासाठी, त्यांची वाढ होण्यसाठी, त्यांच्या दैनंदिन कामासाठी लागणारी उर्जा मिळवण्यासाठी सजीवांकडून ग्रहण केल्या जाणाऱ्या पदार्थाला अन्न असे म्हणतात. तसे जीवशास्त्राच्या व अन्य शास्त्रानुसार अन्नाच्या अनेक व्याख्या आहेत.अन्न विविध घटकांना एकत्र करून तयार केले जाते. त्यात असलेले विविध घटक म्हणजे प्रथिने, स्बिग्ध पदार्थ, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि चरबी . हे सर्व सजीवांच्या पेशींद्वारे वापरले जातात. शरीराचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी शरीराला संतुलित प्रमाणात आहाराची गरज असते. वरील पाच पोषक तत्वाकडून शरीराला संतुलित आहार मिळू शकतो. संतुलित आहारात ताज्या पालेभाज्या, फळांचा आणि कडधान्याचा समावेश होतो. मानवी शरीरातील स्नायू, हाडे, रक्त आणि त्वचा आणि तयार करण्यासाठी, देखरेख करण्यासाठी आणि पुनर्संचयित करण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात.
सर्वेनुसार काही निरीक्षणे नोंदवली गेली आहेत...
बरेचदा आपण बाहेर असताना खाण्याचं सामान किंवा भाजी घेतो व नंतर लक्षात येतं की हे आधी फ्रीज मध्ये पडलेल होतं. त्यामुळे सामान तर वाया जातेच वर पैसे सुद्धा जातात. अशावेळी, आपण जेव्हा बाहेर असतो किंवा बाजारात खाण्याच्या सामानाची खरेदी करण्यासाठी बाहेर पडतो त्यावेळी घरात खाण्याच्या पदार्थांची किंवा भाजीची यादी करा म्हणजे उगाच जास्तीचं काही घेतलं जाणार नाही.
बाजारातून आणलेले अन्नपदार्थ आणि भाज्या नीट साठवा जेणेकरून ते खराब होणार नाहीत. उरलेले अन्नपदार्थ बाहेर न ठेवता नीट झाकून फ्रीज मध्ये ठेवा, फळभाज्या नीट धुवून साठवा आणि पालेभाज्या निवडूनच साठवा.पालेभाज्या धुवून साठवल्या की जास्त टिकत नाहीत.
आपले महत्वाचे १० मिनिटे अन्न वाचवण्याच्या "अन्न हेच पूर्णब्रह्म" ह्या मोहिमेला नक्कीच यशस्वी करू शकता.
भविष्यातील भयाण वास्तवाची आजच आपल्या आणि येणाऱ्या पिढीला अन्न सुरक्षीततेची जाणीव करून द्या.
आपल्या पृथ्वी तलावर अन्न धान्य पिकवणारी माती मर्यादित स्वरुपात उपलब्ध आहे. मात्र लोकसंख्या वाढ अनियंत्रीत आहे..
घरचे जेवण हे आपल्यासाठी अमृतासारखे असते आणि ते आपल्या आरोग्यासाठी देखील वरदान ठरत असते.
भाजीपाल्याला किंमत न मिळाल्यावर, शेतकरी मोठ्या प्रमाणात भाज्या फेकतात.
तीच जर गरीब लोकांना वाटली, तर त्यांचे आशीर्वाद मिळतील.
विवाहात होते अन्नाची नासाडी
विचार करा याचा होते नुकसान किती.
उघडयावर न झाकता ठेवलेले अन्न खाणे टाळा याने आपल्याला अन्नातुन विषबाधा होऊन विविध आजारांना बळी पडावे लागते.
आपण ह्या संकेतस्थळाला भेट दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. अन्न हेच पूर्णब्रह्म हि मोहीम तेच्व्हाच यशस्वी होईल ज्यावेळी आपल्या सारखा प्रत्येक जण ह्या मोहिमेत यशस्वी सहभागी होऊन अधिकाधिक लोकांनपर्यंत याविषयी माहिती पोहचवेल. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्याकडे वेळ नसतो, परंतु अन्न ज्यावर आपले आयुष्य, रोजचा दिनक्रम, आपली उर्जा शक्ती सर्व काही अवलंबून आहे त्याला आपण महत्व दिले पाहिजे. आपण ह्या संकेतस्थळाचे पहिले पेज बघून थांबणार नाहीत तर यातील प्रत्येक पेज बघून त्यातील माहिती अभ्यासपूर्वक बघाल असा मी विश्वास व्यक्त करते. आपला सकारात्मक अभिप्राय ह्या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी नक्कीच फायेशीर ठरेल. अन्नाविषयीची जागरूकता आपण शाळेत, कॉलेजमध्ये, उपहारगृहात, हॉटेल्स, कार्यालय, विवाह समारंभ पार पडणारी ठिकाणे, डायनिंग हॉल या ठिकाणी करू शकतो.
प्रत्येकाने आपल्या सभोवतालचे जग थोडे अजून छान करण्याचा प्रयत्न केला तरी सगळे जग खूप लवकर बदलून जाईल कारण माझ्या एकटीने संपूर्ण जग बदलणार नाही , पण माझ्या ह्या विचाराने सगळ्यांनी एकत्र येऊन नक्कीच सगळे जग बदलेल असा मला विश्वास आहे. चला तर मग जग अधिक सुंदर करूया,जग बदलूया....
- आदिश्री अविनाश पगार