सहभाग

divyamarathi newspaper
lokmat newspaper
Chatrabharati
Robin Hood Army

pudhari newspaper
siddi international academy
swami vivekanand school

रॉबिन हुड आर्मी (RHA)

रॉबिन हुड आर्मी (RHA) ही एक सामाजिक संस्था आहे ,RHA कोणाकडूनही आर्थिक मदत घेत नाही. RHA ही पोर्तुगाल *रिफुड प्रोग्रॅम* यांच्या धर्तीवर ऑगस्ट २०१४ मध्ये सुरवात केली तेव्हा नील घोष आणि त्यांचे सहकारी यांनी दिल्ली मध्ये पहिली फूड ड्राईव्ह केली त्यानंतर काही महिन्यात ८शहरात RHA ने काम चालू झाले, २०१८ मध्ये १०३ शहरांमध्ये पोहोचली. त्यानंतर २०१९ ला १५९ शहरांमध्ये ४२००० रॉबिन्स काम करत होते तसेच जगात १२ देशांमध्ये पोहोचली होती. २०२२ मध्ये ४०१ शहरांमध्ये काम करत आहे.
कार्यपद्धती
RHA ही संस्था लग्न समारंभ, पार्टी, हॉटेल मध्ये उरलेले अन्न आमचे रॉबिन्स जमा करतात आणि स्वतःच्या वाहनांमध्ये किंवा भाडोत्री गाडीत नेऊन ते गरीब लोकांना वाटतो. आमची जमेची बाजू म्हणजे आमचे रॉबिन्स हे सर्व वयोगटातील सर्व स्तरातील नोकरी,व्यवसाय,शिक्षण सांभाळून उरलेल्या रिकाम्या वेळेत उत्स्फर्तपणे काम करत असतात.

हे काम आपण का करतो?
याचे कारण म्हणजे माणसाची भूक, तुम्हाला माहित आहे का जगात रोज ८५करोड २०लाख लोक उपाशी पोटी झोपतात , भारतातील जवळपास ३०००मुले रोज उपाशी असतात एका बाजूला ही परिस्थिती असताना आपल्या कडे ४०% शिजवलेले अन्न वाया जात असते म्हणून वाया जाणाऱ्या अन्नचा सदुपयोग करण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही करत असतो.
RHA नाशिक बद्दल
15सप्टेंबर 2018 ला साधारण 6-7 लोकांनी नाशिक मध्ये चालू केले. 4 वर्षाच्या कालावधीत आम्ही 10लाख पेक्षा जास्त लोकांना अन्न वाटायचे काम केले आहे, ह्यासाठी आमच्या कडे एकूण 200+रॉबिन्स आहे पण साधारण 15-20 रॉबिन्स नेहमीच सक्रिय असतात.
दर वर्षी १५ ऑगस्ट रोजी आम्ही ३०० ते १००० कुटुंबासाठी पुरेल एवढा महिन्याचा किराणा आदिवासी भागात जाऊन वाटत असतो. तसेच चप्पल आणि क्लॉथ ड्राईव्ह देखील आदिवासी भागात करत असतो.

RHA फक्त उरलेले अन्न वाटत नाही तर अनेक उपक्रमात सहभागी आहे जसे चप्पल ड्राईव्ह, क्लॉथ ड्राईव्ह, ब्लड कॅम्प, हेल्थ चेक अप कॅम्प त्याच बरोबर आम्ही झोपडपट्टी तील मुलांसाठी दर रविवारी सकाळी अकॅडमी चालवत असतो, यामध्ये ३५+मुले येत असतात त्यात त्यांना गणित , इंग्लिश शिकवले जाते.
संपर्क साधायचा असेल तर
हा सामाजिक उपक्रम अजून चांगला व मोठा होण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे, ती मदत तुम्ही आम्हाला एक स्वयंसेवक म्हणून जेवण वाटण्यासाठी किंवा अकॅडमी मध्ये मुलांना शिकिण्यासाठी देऊ शकतात. तसेच आपल्याकडे ५० पेक्षा अधिक लोकांचे जेवण उरलेले असेल तर तुम्ही आम्हाला http://wa.me/+918971966164 व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधू शकता.
तसेच अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट दया.
www.robinhoodarmy.com